Advertisement

मेट्रो-३ प्रकल्पातील भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे स्थानकांचं काम केलं जातं असून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या सीएसआयए टी-१ स्थानक इथं भुयारीकरणाचा ३१वा टप्पा पार पडला आहे.

मेट्रो-३ प्रकल्पातील भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार
SHARES

मुंबई मेट्रोच्या कामांना गती मिळाली आहे. टप्प्याटप्प्यानं भुयारीकरणाचं काम केलं जातं असून, भविष्यात लवकरच हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे स्थानकांचं काम केलं जातं असून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या सीएसआयए टी-१ स्थानक इथं भुयारीकरणाचा ३१वा टप्पा पार पडला आहे.Â

पॅकेज-६ च्या टेराटेक निर्मित तापी-१ या टनेल बोअरिंग मशीनद्वारे सहार ते सीएसआयए टी-१(आंतरदेशीय विमानतळ) पर्यंतचे १.५ किमी अंतर ४४९ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. या स्थानकाच्या भुयारीकरणासाठी एकूण १०८० रिंग्सचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय, सीएसआयए टी-१ हे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे स्थानक आहे.

या स्थानकावरून दररोज एक लाखापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करणे अपेक्षित आहे. सीएसआयए टी-१ स्थानक आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळांना जोडले जाणार आहे व त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

सीएसआयए टी-१ स्थानकाचे एकूण ५५टक्के  काम पूर्ण झाले आहे. सीएसआयए टी-१ (आंतरदेशीय विमानतळ), सीएसआयए टी-२ (आंतरराष्ट्रीय विमानतळ) व सहार रोड स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-६ चे एकूण ८५टक्के  भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ८७ टक्के भुयारीकरण व ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या एकूण ७ टीबीएमद्वारे विविध भागात भुयारीकरण सुरू असून येत्या काही महिन्यात आणखी काही भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा