Advertisement

... म्हणून मुंबई मेट्रो प्लॅस्टिक टोकनचा वापर टाळणार

मुंबईला अद्याप मेट्रो सेवा सुरू करण्याची घाई नसली तरी शहरात सार्वजनिक वाहतुक पुन्हा सुरू होईल तेव्हा यासाठी एमएमओपीएल योजना आखत आहे.

... म्हणून मुंबई मेट्रो प्लॅस्टिक टोकनचा वापर टाळणार
SHARES

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं आपल्या मेट्रो सिस्टममध्ये प्लास्टिकची टोकन तयार न करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं अशीच पावलं उचलण्याचा निर्णय घेतला.

एमएमओपीएलनं यावर्षी जानेवारीमध्ये प्लास्टिक टोकनवरून कागदावर आधारित क्यूआर तिकिटांवर स्विच करण्यास सुरवात केली आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं की, संपूर्ण मेट्रो वन मार्चपर्यंत कागदाच्या क्यूआर तिकिटांचा वापर करणार होती. परंतु देशव्यापी लॉकडाऊननं या योजनांना काही प्रमाणात ब्रेक लावला आहे. पण या योजना उशीर का होईना पण लॉक़ाऊन उठल्यानंतर लागू होतील.  

मुंबईला अद्याप मेट्रो सेवा सुरू करण्याची घाई नसली तरी शहरात सार्वजनिक वाहतुक पुन्हा सुरू होईल तेव्हा यासाठी एमएमओपीएल योजना आखत आहे. कागदाची तिकिटं देण्याव्यतिरिक्त, एमएमओपीएलनं म्हटलं आहे की, नोटांच्या पृष्ठभागाशी कोणताही संपर्क होऊ नये म्हणून ते वापरकर्त्यांना मोबाईल फोनवर तिकीट मिळवण्यास प्रोत्साहित करणार आहेत.

“आम्ही कॉन्टेक लेस संपर्क ठेवण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि स्मार्ट कार्डचा अधिक वापर करण्यास प्रोत्साहित करू. कागदाच्या तिकिटांचादेखील मर्यादित वापर होईल, 'असं हिंदुस्तान टाईम्सला एका सूत्रानं सांगितलं.

याव्यतिरिक्त, एमएमआरडीए (मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी) कॉमन मोबिलीटी कार्ड वापरण्याच्या विचारात आहोत. या कार्डचा उपयोग मेट्रो, बस, रेल्वे, टोल, पार्किंग, स्मार्ट सिटी आणि किरकोळ दुकानांवर देखील करता येईल. या कार्डद्वारे तिकीट काउंटरवरील गर्दी, कंडक्टरशी व्यवहार, टोल अथवा पार्किंग शुल्क या गोष्टींपासून सुटका होईल. त्यामुळे संसर्गचा धोका देखील कमी होईल.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा