Advertisement

मुंबईतल्या 'या' चौपाटीवर दुसरा व्ह्यूईंग डेक उभारला जातोय

दादरमध्ये व्ह्युईंग डेक उभारल्यानंतर पालिका आणखी एक व्ह्युईंग डेक उभारण्याच्या तयारीत आहे.

मुंबईतल्या 'या' चौपाटीवर  दुसरा व्ह्यूईंग डेक उभारला जातोय
On February 9, a viewing deck was inaugurated at Dadar Chowpatty adjoining the Chaityabhoomi grounds.(File Image)
SHARES

दादरमध्ये व्ह्युईंग डेक उभारल्यानंतर पालिका आणखी एक व्ह्युईंग डेक उभारण्याच्या तयारीत आहे. गिरगाव इथं दुसरा व्ह्युईंग डेक पर्यटकांसाठी उभारण्यात येत आहे. सर्व सामान्यांसाठी मार्चपर्यंत हा डेक खुला करण्यात येईल.

गिरगाव चौपाटीवरील व्ह्यूइंग डेकवरून मुंबईकरांना अरबी समुद्र आणि मरिन ड्राइव्ह इथला क्वीन्स नेकलेस पाहता येईल.

अहवालानुसार, या डेकचे बांधकाम जोरात सुरू आहे आणि पुढील महिन्याच्या पहिल्या सहामाहीत ते लोकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. यासह, मुंबईला या वर्षात महिनाभरात दुसरा आणि एकूणच मुंबईतील चौथा व्ह्यूइंग डेक मिळेल.

गिरगावात व्ह्यूइंग डेक बांधण्याची कल्पना बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मांडली होती.

गिरगावातील हा व्ह्यूइंग डेक समुद्रकिनाऱ्यावरील वादळाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या बाहेर बांधला जात आहे आणि डेकचे अंदाजे क्षेत्रफळ सुमारे ५०० चौरस फूट असेल. हा डेक आसन क्षेत्र आणि सार्वजनिक स्वच्छतागृह या सोईसुविधांसह सज्ज असेल.

जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डेक सौंदर्यपूर्ण पद्धतीनं प्रकाशित केला जाईल. या प्रकल्पाचा प्रभारी सहाय्यक महापालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकल्पाची किंमत ५ कोटी रुपये आहे.

काँक्रीट आणि सिमेंटचा समावेश असलेली सर्व संरचनात्मक कामे पूर्ण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. सध्या फ्लोअरिंग, रोषणाई आणि रेलिंग बांधण्याचे काम सुरू आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, ९ फेब्रुवारी रोजी चैत्यभूमी मैदानाला लागून असलेल्या दादर चौपाटीवर व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन करण्यात आले होते.

गेल्या वर्षी, माहीम समुद्रकिनारी असलेल्या वॉच टॉवरच्या वरच्या बाजूला असलेल्या व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. शहराचे सर्वात जुने व्ह्यूइंग डेक मलबार हिलच्या शिखरावर आहे.



हेही वाचा

ताडदेवमध्ये 'इथे' बनवण्यात आले थीमॅटिक पार्क

मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा