मुंबईत सुरक्षित प्रवासाचं स्वप्न पूर्ण होईल?

मुंबई - नुकत्याच वर्ल्ड बँकच्या सीइओ क्रिस्तलिना जॉर्जिव्हा यांनी मुंबईची लाईफलाइन असलेल्या रेल्वेने प्रवास केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या वेळी जॉर्जिया यांनी शहरी वाहतूक आणि कृषी क्षेत्रासंबंधातील सेवेच्या विकासासाठी 7 हजार कोटींचे अर्थसाह्य देणार असल्याचे जाहीर केले. या गुंतवणूकीमुळे मुंबईकरांना सुखकर, सुरक्षित आणि चांगली सेवा प्रवासी म्हणून मिळेल, असा आशावाद जॉर्जिव्हा यांनी व्यक्त केला. आम्ही मुंबईकरांनाच विचारलंय कि त्यांना रेल्वे प्रवास करताना कोणत्या गोष्टीत बदल व्हावं असं वाटतंय?

Loading Comments