Advertisement

नरिमन पॉइंट ते कफ परेड कोस्टल रोडच्या कामाची सुरुवात पुढील वर्षी

नरिमन पॉइंट ते कफ परेड दरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नरिमन पॉइंट ते कफ परेड कोस्टल रोड उभारण्याचा सल्ला एका सल्लागार कंपनीने दिला होता. २००८ मध्ये तत्कालीन सरकारने याला मान्यताही दिली होती.

नरिमन पॉइंट ते कफ परेड कोस्टल रोडच्या कामाची सुरुवात पुढील वर्षी
SHARES

मागील काही वर्षांंपूर्वीपासून बासनात गुंडाळलेल्या नरिमन पॉइंट ते कफ परेड कोस्टल रोडच्या कामाला आता पुढील वर्षी सुरूवात होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची तयारी सुरू केली आहे.  

नरिमन पॉइंट ते कफ परेड दरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नरिमन पॉइंट ते कफ परेड कोस्टल रोड उभारण्याचा सल्ला एका सल्लागार कंपनीने दिला होता.  २००८ मध्ये तत्कालीन सरकारने याला मान्यताही दिली होती. एमएमआरडीएने हा प्रकल्प हाती घेण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरीही मिळविली होती. मात्र त्याच वेळी नरिमन पॉइंट पुनर्विकासाची योजना प्रस्तावित असल्याने हा कोस्टल रोड मागे पडला. त्यानंतर २०१९ मध्ये मुंबई महापालिकेनेही हा कोस्टल रोड बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या. पण त्यानंतर या प्रकल्पाबाबत काहीच झालं नाही.

काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने हा प्रकल्प पुन्हा हाती घेण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.१.६ किमी लांबीच्या ह्या कोस्टल रोडमध्ये एकूण चार मार्गिका (येण्यासाठी दोन आणि जाण्यासाठी दोन) आहेत. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे.मार्ग कुठून आणि कसा जाईल हे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. 

मुंबई आणि परिसरात सध्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू यांचे काम वेगाने सुरू आहे. तर मीरा भाईंदर ते वर्सोवा सागरी सेतू आणि वसई ते मीरा भाईंदर खाडी पूल असे दोन प्रकल्प प्रस्तावित आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा