म्हाडाच्या २१७ घरांसाठी ६ हजार अर्ज

म्हाडाच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळात असून सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत म्हाडाला ५ हजार ९५२ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

SHARE

म्हाडानं नुकतीच सहकार नगर, चेंबूर आणि कोपरी गावातील २१७ घरांची लॉटरी जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणे म्हाडाच्या या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळात असून सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत म्हाडाला ५ हजार ९५२ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. १३ एप्रिलपर्यंत या घरांसाठी अर्ज करता येणार असल्यामुळं अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


दुकानांसाठी ई-नोंदणी

सध्या सुरू असलेल्या २१७ घरांच्या लॉटरीपैकी १७० घरं एलआयजी श्रेणीसाठी तर ४७ घरं एमआयजी श्रेणीसाठी ठेवण्यात आली आहेत. गृहनिर्माण लॉटरीसह, म्हाडानं मुंबई आणि कोकण इथं २७६ दुकानांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे.


ई-लिलाव

इच्छुक खरेदीदारांना ई-लिलावात सहभागी होण्यासाठी म्हाडाद्वारे निर्धारित केलेल्या बँकेमध्ये दुकानाच्या मूल्याच्या १० टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे. तसंच यासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ई-लिलाव २ एप्रिल सकाळी ११ वाजल्यापासूनन ५ एप्रिल दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा - 

मोनोरेल स्थानकांवर आता सोलार पॅनल

चिंचपोकळी परिसरात चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू
संबंधित विषय
ताज्या बातम्या