Advertisement

मोनोरेल स्थानकांवर सोलार पॅनल

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल स्थानकांच्या छतांवर सोलार पॅनल लावण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या विजबिलावर अंकुश घालण्यासाठी मोनोरेल प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मोनोरेल स्थानकांवर सोलार पॅनल
SHARES

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल स्थानकांच्या छतांवर सोलार पॅनल लावण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या विजबिलावर अंकुश घालण्यासाठी मोनोरेल प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मोनोरेलच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारीही ‘एमएमआरडीए’कडे सोपवण्यात आली आहे.


४ कोटींची बचत

मोनोरेल प्रशासनाने सध्या बचतीच्या दिशेने एक पाऊल पुढं टाकलं आहे. विजबिलात बचत व्हावी यासाठी मोनोरेल प्रशासन मोनो स्थानकांच्या छतांवर सोलार पॅनल लावणार आहे. याद्वारे मोनोरेलची वार्षिक ४ कोटी रूपयांची बचत होणार आहे. लवकरच दादर (पूर्व) स्थानक सोडून अन्य स्थानकांवर सोलार पॅनल लावण्यात येणार आहेत.


२४ वर्षांचं कंत्राट

‘एमएमआरडीए’ने एका खाजगी कंपनीला २४ वर्षांच्या कालावधीसाठी सोलर पॅनलच्या खरेदी विक्रीसाठी कंत्राट दिलं आहे. सद्यस्थितीत मोनोरेलला टाटा पॉवर कंपनीकडून विजपुरवठा करण्यात येतो. तसंच यासाठी प्रति युनिट ११ रूपये दर आकारला जातो. त्यामुळं प्राधिकरणाला विजेच्या बिलापोटी दर महिन्याला ७५ लाखांचा खर्च येतो.  या सोलार पॅनलचा वापर केल्यास कंपनीला प्रति युनिट ३.७५ रूपये द्यावे लागणार आहेत. तसंच त्याच्या साहाय्यानं एस्कलेटर आणि लिफ्टदेखील चालवण्यात येणार आहेत.




हेही वाचा -

दुसरा टप्पा मोनोला फळला; आठवड्यात ३६ लाखांची कमाई

परळच्या बेस्ट कामगार वसाहतीची होणार दुरुस्ती




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा