Advertisement

दुसरा टप्पा मोनोला फळला; आठवड्यात ३६ लाखांची कमाई

मोनोच्या या दुसऱ्या टप्प्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये मोनोने तब्बल ३६ लाखांची कमाई केली आहे.

दुसरा टप्पा मोनोला फळला; आठवड्यात ३६ लाखांची कमाई
SHARES

आठवड्याभरापूर्वीच मोनोच्या चेबूर ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. मोनोच्या या दुसऱ्या टप्प्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये मोनोने तब्बल ३६ लाखांची कमाई केली आहे.


प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून हा टप्पा सुरू झाल्यापासून एकूण १ लाख ९८ हजार ५२५ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मोनोरेल प्रशासनाकडून देण्यात आली. याच माध्यमातून मोनोला तब्बल ३६ लाख ८ हजार ६६२ रूपयांची कमाई झाली आहे. यावरूनच मोनोचा दुसरा टप्पा प्रवाशांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. मुंबईकरांच्या सुखमय प्रवासासाठी दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून येत्या काळात दोन सेवांमधील वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मोनो प्रशासनाकडून सांगण्यात आलं. तसंच येत्या काळात प्रत्येक स्थानकावर पिण्याच्या पाण्याची आणि आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.




हेही वाचा -

आता मुंबईहून थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा

अभियांत्रिकी शाखेचा प्रथम वर्ष सत्र १ निकाल जाहीर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा