पादचारी पूलाचे भुमिपुजन

 Sham Nagar
पादचारी पूलाचे भुमिपुजन

जोगेश्वरी - जोगेश्‍वरीतील रेल्वे प्रवाशांची तसेच जनतेची लवकरच रेल्वे अपघातापासून सुटका होणार आहे. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जोगेश्‍वरी पूर्व - पश्‍चिम अशा जोडणार्‍या पादचारी  पूलाचे भुमिपुजन करण्यात येणार आहे.

जोगेश्‍वरी रेल्वे स्थानक येथे पूर्व आणि पश्‍चिम बाजूला जोडणारा पादचारी  पूल नसल्याने येथील रहिवाशांना जीव मुठीत धरुन पूर्व तसेच पश्‍चिमेस जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडून जावे लागत होते. या पूलाच्या पूर्व बाजुस इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच पश्‍चिमेस माल्कम बागेजवळ सरकते जिने बसविण्यात येणार असून काम पूर्ण झाल्यावर जोगेश्‍वरीतून रेल्वे प्रवास करणारे तसेच रहिवाशी यांची अपघातापासून सुटका हेाणार आहे.

Loading Comments