मालाडमधील शौचालयाचे उद्घाटन दोन वर्षांपासून रखडले

 Malad
मालाडमधील शौचालयाचे उद्घाटन दोन वर्षांपासून रखडले
मालाडमधील शौचालयाचे उद्घाटन दोन वर्षांपासून रखडले
See all

मालाड - अंबोजवाडी परिसरातील दोन शौचालयाचे उद्घाटन गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा वापर करता येत नाहीय. याविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

आमदार असलम शेख यांच्या आमदार निधीतून म्हाडातर्फे हे शौचालय उभारण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी या शौचालयाचे काम करण्यात आले. मात्र ते अद्याप स्थानिकांसाठी खुले करण्यात आले नाही. पालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही शौचालये स्थानिकांसाठी खुली करावी अशी मागणी नागरिकांनी केलीय. नाहीतर आम्ही स्वतः शौचालय खुले करू, असा इशारा वंदे मातरम फाउंडेशन संस्थेनं दिलाय.

शौचालयांच्या ड्रेनेजचे काम बाकी आहे, ते पूर्ण झाल्यानंतर शौचालय नागरिकांसाठी खुले केले जाईल, असे पी उत्तर पालिका विभागाकडून देण्यात आले आहे. मात्र यासंदर्भात आमदार असलम शेख यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Loading Comments