कुर्ल्यात पाणीबाणी

 Kurla
कुर्ल्यात पाणीबाणी

कुर्ला - कुर्लावासियांनो, पुढच्या आठवड्यात पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करा. कारण पुढच्या आठवड्यात 4 आणि 5 आॅक्टोबरला कुर्ल्यातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एल विभागाच्या साकीनाका जंक्शन येथील ब्लू स्टार कंपनीजवळ कुर्ला दक्षिण आणि कुर्ला उत्तर मुख्य जलवाहिन्यांची जोडणी आहे. या जोडणीवरची 200 मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम 4 आॅक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेले हे काम 24 तास अर्थात 5 आॅक्टोबरला सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे यादरम्यान या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पाणी बंद रहाणारे भाग -

प्रभाग क्रमांक 123, प्रभाग क्रमांक 150 ते 164 मधील गुरूनानक नगर, लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला स्थानक, तकियावार्ड, कमानी, स्वदेशी मिल, कसाईवाडा, कोहिनूर, काजूपाडा, जलवाहिनी मार्ग, 90 फुटी रस्ता, जरीमरी, घाटकोपर, अंधेरी जोडरस्ता, अशोकनगर, मिलिंदनगर, केबीएम कंपाऊंड मार्ग

Loading Comments