SHARE

मुंबई - बाटली बंद पाणी साध्या दुकानातून खरेदी केली तर तिच्यासाठी 20 रुपये मोजावे लागतात. पण हीच पाण्याची बाटली मल्टिप्लेक्स, मॉल वा विमानतळावर खरेदी केली तर त्यासाठी चक्क 40 ते 50 रुपये मोजावे लागतात. मूळ किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारात मल्टिप्लेस, मॉल विमानतळासह अन्य ठिकाणी ग्राहकांची लूट केली जाते. पण आता ही लूट थांबणार आहे. कारण केंद्र सरकारने आता बाटली बंद पाण्यासाठी समान दर लागू केले आहेत. सोमवारी यासंबंधीची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांची आर्थिक लूट करणाऱ्यांना चाप बसेल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल, असे म्हणत हा निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले आहे.

‌पाण्याच्या बाटलीसह इतर पेय आणि खाण्याच्या वस्तू मूळ किंमतीपेक्षा दामदुपटीत विकल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहकांची ही लूट थांबवण्याची मागणी ग्राहक पंचायतीसह देशभरातील अन्य संघटनाकडून होत होती. ही मागणी लक्षात घेत केंद सरकारने आता समान दर लागू केले आहेत. त्यानुसार जादा किंमती आकारण्यांवर वैध मापन विभागाकडून कारवाई होणार आहे. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत होत असले तरी इतर पेय आणि वस्तूंसाठीही समान दर लागू करावेत, अशी मागणी शिरीष देशपांडे यांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या