Advertisement

मेट्रो-७ : कांदिवलीत दोन गर्डरचं यशस्वी लाॅन्चिंग


मेट्रो-७ : कांदिवलीत दोन गर्डरचं यशस्वी लाॅन्चिंग
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो-७ चं काम सध्या वेगात सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी एमएमआरडीएनं मेट्रो-७ च्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. एमएमआरडीएकडून कांदिवली इथं रविवारी पहाटे दोन भव्य गर्डर यशस्वीपणे बसवण्यात अाल्याची माहिती माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली.


अवघड, क्लिष्ट काम

मेट्रो मार्गाच्या कामाअंतर्गत गर्डर लाॅन्चिंग करणं हे अत्यंत अवघड आणि क्लिष्ट काम असतं. त्यातही पावसाळ्यात गर्डर लाॅन्चिंग करणं आणखी अवघड. असं असताना पावसाळ्यात एमएमआरडीएकडून दोन गर्डरचं यशस्वीपणे बसवण्यात अाले.  कांदिवलीतील ठाकूर काॅम्प्लेक्सजवळील पीअर क्रमांक १६९ आणि पीअर क्रमांक १७० इथं हे गर्डर बसवण्यात आले आहेत.


वीज खंडीत

प्रत्येकी १५० टन वजनाचे २५ मीटर लांबीचे आणि ५.२५ मीटर रूंदीचे असे हे गर्डर आहेत. प्रत्येकी ४०० टन आणि ३५० टन क्षमतेच्या क्रेन्सच्या मदतीनं ८ मीटर उंचीच्या खांबावर हे दोन गर्डर बसवण्यात आले. दरम्यान, बोरीवली-मालाड मार्गावरील टाटा पाॅवर कंपनीच्या ११० के. व्ही. क्षमतेच्या विद्युत विद्युत वाहिन्यांच्या खालीच हे काम होणार असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव या भागातील वीज पुरवठा काही काळ खंडीत करण्यात आला होता.



हेही वाचा -

मुंबईकर पुन्हा गॅसवर, गॅसच्या किमती वाढल्या

मेट्रो-४ लाही वादाचं ग्रहण, घाटकोपरवासियांचा विरोध

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा