घाटकोपरच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र


SHARE

घाटकोपर - घाटकोपर पोस्ट ऑफिस येथे 'पासपोर्ट सेवा केंद्र' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अधिकृत घोषणा केली आहे. या पासपोर्ट ऑफिसची औपचारिकता लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. सुषमा स्वराज यांनी केलेल्या या घोषणेमुळे घाटकोपरच्या रहिवाशांचा वरळी येथे पासपोर्टसाठी जाण्याचा त्रास वाचणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या