शौचालयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

 Kandiwali
शौचालयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
शौचालयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
शौचालयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
See all

गणेशनगर - कांदीवली पश्चिमेकडील गणेशनगर परिसरातील दुमजली शौचालयाची गेल्या 15 वर्षांपासून दुरूस्ती झाली नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नादुरूस्त शौचालयाची दुरवस्था झाली असून ते केव्हाही कोसळेल अशा स्थितीत आहे. विशेष म्हणजे धोकादायक अशा या शौचालयाला टेकू लावण्यात आलाय. त्यातच नागरिकांना शौचालयाची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन जावं लागतं. जवळपास 3 हजार लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिकांना शौचालयाची सुविधाही स्थानिक नगरसेवक आणि आमदारांनी केली नसल्याची आरोप इथलं रहिवासी करतायेत. स्थानिक आमदार आणि नगरसेवक फक्त आश्वासनं देत असल्याचं इथल्या रहिवाश्यांचं म्हणण आहे.

याबाबत स्थानिक नगरसेविका गीता यादव यांना विचारले असता, शौचालयाच्या देखरेखीचं काम माजी नगरसेवक कमलेश यादव यांच्या संस्थेला देण्यात आले आहे. ही संस्था त्याची देखरेख करत नाही, त्यामुळे शौचालयाची दुरवस्था झाली आहे. असं सांगत त्यांनी हात झटकले. तसेच 15 दिवसांपूर्वी आपण आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांसोबत पाहणी दौरा केला असल्याचे त्यांनी सांगितलं. पालिकेनं त्या संस्थेचं कंत्राट रद्द करून स्वत: शौचालय चालवावे असं त्या यावेळी म्हणाल्या.

Loading Comments