चेंबुरच्या टपाल कार्यालयाची दुरवस्था

 Lokhande Road
चेंबुरच्या टपाल कार्यालयाची दुरवस्था

लोखंडे मार्ग - खासगी बँका आणि कुरिअर प्रमाणेच ग्राहकांना जलद आणि अत्याधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न सध्या टपाल खात्याकडून सुरु आहे. पण, चेंबूर स्थानकाजवळ असलेल्या टपाल खात्याची कित्येक वर्षे दुरुस्तीच न झाल्याने सध्या हे टपाल कार्यालय दुरवस्थेत आहे.

पी.एल लोखंडे मार्गावरील नागरिकांच्या मागणीनुसार चेंबूर स्थानकाच्या शेजारी टपाल कार्यालयाला पालिकेची जागा दिली. पण, सध्या या कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय देखील नाही. खुर्च्या आणि टेबल तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर कार्यालयाच्या भिंतीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे टपाल विभागाने तत्काळ या कार्यालयाचं नूतनीकरण करावं, अशी मागणी निब्बाण सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्वानंदी तांबे आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वाती तपासे यांनी केली आहे.

Loading Comments