'रेरा'संबंधी शनिवारी जुहूमध्ये कार्यशाळा

  Juhu
  'रेरा'संबंधी शनिवारी जुहूमध्ये कार्यशाळा
  मुंबई  -  

  महाराष्ट्र स्थावर संपदा अधिनियम अर्थात रिअल इस्टेट रेग्यूलेटरी अॅथॉरिटी (रेरा) कायदा 1 मे पासून लागू झाला आहे. यामुळे बिल्डरांच्या मनमानीला चाप बसणार असून, ग्राहकांची फसवणूक थांबणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हे रेरा नेमकं काय आहे? कसा बिल्डरांना चाप बसणार?  ग्राहकांची फसवणूक कशी थांबणार? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांच्याच मनात आहेत. रेरामध्ये नेमकं काय दडलंय हे जाणून घेत तुमच्या मनातील रेरा संबंधीच्या अनेक प्रश्नांची उकल करून घेण्याची सुवर्णसंधी रेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्याकडून मुंबईकरांना शनिवारी उपलब्ध होणार आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने रेरा कायद्यात दडलंय काय? या विशेष कार्यशाळेचे आयोजन शनिवारी 6 मे रोजी विद्यानिधी भवन-2 जेव्हीपीडी स्कीम जुहू येथे केले आहे. या कार्यशाळेला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रेराची माहिती करून घ्यावी असे आवाहन पंचायतीचे अध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी केले आहे.

  रेरा कायाद्यातील विविध पैलू सोप्या भाषेत सर्वसामान्यांना उलगडून देण्याचा प्रयत्न या कार्यशाळेद्वारे केला जाणार आहे. ग्राहकांच्या रेराकडून काय अपेक्षा आहेत हे ही यावेळी जाणून घेण्यात येणार आहे. तर खुद्द रेराचे अध्यक्ष यावेळी उपस्थित राहून प्रश्नांची उत्तरे देणार असल्याने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.