अखेर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला मुहूर्त सापडला, रविवारी वडाळा -सातरस्ता मोनो सुरू

दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर स्थानकांचा समावेश असेल.

SHARE

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर मुहूर्त सापडला असून वडाळा ते सातरस्ता हा मोनोचा दुसरा टप्पा रविवारपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता संत गाडगे महाराज चौक येथे हा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.


प्रवासी वाढणार ?

दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर स्थानकांचा समावेश असेल. यापूर्वी मोनोरेलचा पहिला टप्पा २०१४ साली सुरू करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु मोठ्या विलंबानंतर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात होणार आहे. तसंच दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर एक लाख प्रवासी मोनोचा लाभ घेतील असा अंदाज बांधला जात आहे.


वेळेची बचत

चेंबूर ते वडाळा मोनोच्या पहिल्या टप्प्याचे अंतर ८.२६ कि.मी. आहे. तर चेंबूर ते सातरस्ता हे अंतर ११.२८ कि.मी. आहे. यापूर्वी हे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तास लागत होता. परंतु मोनोमुळे हे अंतर पार करण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागेल. दुसरा टप्पा सुरू होणार असल्याने आता मुंबईकरांचा वडाळा ते सातरस्ता हा प्रवास सुखकर होणार आहे.हेही वाचा -

आता ट्रॅफिक पोलिस थेट घरी नोटीस पाठवणार

परळ टर्मिनसचे रविवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पणसंबंधित विषय
ताज्या बातम्या