Advertisement

आता ट्रॅफिक पोलिस थेट घरी नोटीस पाठवणार

गेल्या वर्षी ‘ई-चलन’नंतर केवळ ५० टक्के दंड वसूल झाला होता. तसंच जवळपास १०० वाहन चालकांकडून अद्यापही ५० हजरांपेक्षा अधिकचा दंड वसूल होणे बाकी आहे. तर ३ वाहन चालकांकडून एक लाखांचा दंड येणे बाकी आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून केवळ अशाच वाहन चालकांना नोटीस पाठवण्यात येत आहे.

आता ट्रॅफिक पोलिस थेट घरी नोटीस पाठवणार
SHARES

गाडी चालवताना नियमांचं उल्लंघन झाल्यावर ठोठावलेला दंड भरला नसल्यास आता संबंधीत वाहनचालकाला पोलिसांकडून नोटीस मिळणार  आहे. ज्या वाहन चालकांच्या नावावर ५० पेक्षा अधिक चलन आहेत त्यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून ‘ई-चलन’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यास वाहतूक पोलिसांना अपयश आलं आहे. मात्र, आता पोलिसांनी पुन्हा एकदा दंड वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 


५० टक्के वसूली

गेल्या वर्षी ‘ई-चलन’ नंतर केवळ ५० टक्के दंड वसूल झाला होता. तसंच जवळपास १०० वाहन चालकांकडून अद्यापही ५० हजारांपेक्षा अधिकचा दंड वसूल होणं बाकी आहे. तर ३ वाहन चालकांकडून एक लाखांचा दंड येणं बाकी आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून केवळ अशाच वाहन चालकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी ७५ कोटींचा दंड वसूल केला असून ६ लाख वाहन चालकांकडून दंड वसूल होणं बाकी आहे.


एक राज्य एक चलन

वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी ट्रॅफिक पोलिसांनी 'एक राज्य एक चलन' ही डिजिटल चलन प्रणाली सुरू केली आहे. महाराष्ट्रात ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. दोन टप्प्यांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात मुंबई, नागपुर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी आणि चिंचवड या विभागांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.




हेही वाचा -

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी 'ही' नवी सुविधा

विद्यापीठात रंगणार राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा