Advertisement

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी 'ही' नवी सुविधा

सध्या ही सेवा केवळ शताब्दी ट्रेनमध्येच सुरू करण्यात आली असून प्रवाशांचा रिस्पॉन्स पाहून अन्य ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी 'ही' नवी सुविधा
SHARES

मुंबई अहमदाबाद मार्गावर सुरू असलेल्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये ‘शॉपिंग ऑन व्हिल्स’ सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत प्रवाशांना आता प्रवासादरम्यान शॉपिंगचा आनंद घेता येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर केवळ शताब्दी ट्रेनसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.


रिस्पॉन्स पाहून निर्णय

सध्या ही सेवा केवळ शताब्दी ट्रेनमध्येच सुरू करण्यात आली असून प्रवाशांचा रिस्पॉन्स पाहून अन्य ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी पहिल्यांदा मुंबई अहमदाबाद प्रवास करणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या प्रवाशांना शॉपिंग ऑन व्हिल्सचा अनुभव घेता आला. या सेवेमध्ये प्रवाशांना खाद्य पदार्थ, ब्यूटी प्रोडक्ट्स, फिटनेस प्रोडक्ससारख्या अनेक वस्तू खरेदी करता येणार आहेत.


पाच वर्षांचं कंत्राट

या सेवेसाठी रेल्वेनं ‘मेसर्स एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला पाच वर्षांसाठी ३ कोटी ६६ लाखांचं कंत्राट दिलं आहे. सध्या ही सेवा केवळ एका ट्रेनमध्ये सुरू केली असली तरी लवकरच १६ ट्रेनमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन ट्रेनमध्ये ही सेवा सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यावर निर्णय घेतला जाणार आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या माहितीसाठी एक कॅटलॉग वितरित करण्यात येणार आहे. तसंच प्रवाशांच्या सेवेसाठी ट्रेनमध्ये दोन सेल्समनदेखील ठेवण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

सत्ता आल्यास झोडपट्टीवासियांना ५०० चौरस फुटाचं घर - राहुल गांधी

मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र वर्ग का ? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा