परळ टर्मिनसचे रविवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण

रविवारी ३ मार्च रोजी परळ टर्मिनसचं उद्धाटन करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात येणार असून परळ स्थानकातून सुटणाऱ्या १६ लोकलना रेल्वेमंत्री हिरवा कंदील दाखवणार आहेत.

SHARE

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर असून प्रवाशांची परळ स्थानकातून प्रवास करण्याची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण रविवारी ३ मार्च रोजी परळ टर्मिनसचं उद्धाटन करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्धाटन होणार असून परळ स्थानकातून सुटणाऱ्या १६ लोकलना रेल्वेमंत्री हिरवा कंदील दाखवणार आहेत. 


१६ लोकल

एल्फिस्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जागं झालेल्या रेल्वे प्रशासनानं अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी, परळ टर्मिनसचं उभारणी केली. दादर स्थानकात देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळं दादर स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी परळ टर्मिनसहून १६ अप आणि डाऊन लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


 ८ .३८ वा. पहिली लोकल

रविवारी सकाळी परळ टर्मिनसहून कल्याणच्या दिशेनं जाणारी पहिली लोकल सकाळी ८ .२१ वाजता चालविण्यात येणार आहे. तसंच, परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११. ०५ वाजता सुटणार आहे. कल्याणहून परळ टर्मिनसकडे सकाळी ८.३८ मिनिटांना रवाना होणार आहे. तर शेवटची लोकल कल्याणहून ११.१५ वाजता परळ टर्मिनसकडे रवाना होणार आहे.


अनेक सुविधांचं लोकापर्ण

परळ टर्मिनससह रेल्वे मार्गांवरील अनेक सुविधांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामध्ये कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, सायन, दिवा येथील पादचारी पुलांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ स्टेशनची सुधारणा आणि सरकत्या जिन्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याशिवाय पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात येणार आहे.


लोकलचे वेळापत्रक


अप लोकल
डाऊन लोकल
सकाळी - ८.२१
सकाळी - ८.३८
सकाळी - १०.२०
सकाळी - १०.४४
सकाळी - १०.५३ 
सकाळी - ११.०९
सकाळी - ११.५७
दुपारी - १२.१७
दुपारी - १.२२ 
दुपारी - १.४०
दुपारी - २.५२
दुपारी - २.५७
दुपारी - ३.१६
दुपारी - ३.२३
दुपारी - ४.०४
दुपारी - ४.१०
संध्याकाळी - ५.००
संध्याकाळी - ५.१०
संध्याकाळी - ५.२८
संध्याकाळी - ५.३५
संध्याकाळी - ७.१८

संध्याकाळी - ७.२४

रात्री - ८.४९
रात्री - ८.५९ 
रात्री - ९.३१
रात्री - ९.३९
रात्री - ९.५४
रात्री - ९.५९
रात्री - १०.३७
रात्री - १०.४९
रात्री - ११.०५
रात्री - ११.१५हेही वाचा -

छोट्या पडद्यावर अवतरणार 'मोलकरीण बाई'

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी 'ही' नवी सुविधासंबंधित विषय
ताज्या बातम्या