Advertisement

बोरीवलीत स्वयं पुनर्विकासावर मार्गदर्शन


बोरीवलीत स्वयं पुनर्विकासावर मार्गदर्शन
SHARES

पुनर्विकास करण्यास इच्छुक पण, बिल्डरांची मनमानी नको असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या आता स्वयं पुनर्विकासासाठी पुढे येत आहेत. त्यातील एक सोसायटी म्हणजे गोराईतील न्यू एमएचबी काॅलनी. या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी स्वयंपुनर्विकास करण्याचं ठरवलं असून स्वयं पुनर्विकासवर मार्गदर्शन करण्यासाठी ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एका शिबिराचं आयोजन केलं आहे.


कोण करणार मार्गदर्शन?

'गोराई रोड अष्टविनायक नगर वेल्फेअर, असोसिएशन, न्यू एमएचबी काॅलनी' च्या माध्यमातून या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ वास्तुविशारद आणि स्वयं पुनर्विकास तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू उपस्थित राहणार आहेत. ते वसाहतीतील सर्व रहिवाशांना स्वयं पुनर्विकासाचे फायदे आणि प्रक्रिया समजावून सांगतील.
कुठे होणार शिबीर?

हे शिबीर साई प्लाझा हाॅल, अष्टविनायक नगर, न्यू एमएचबी काॅलनी, बोरीवली (प) इथं होणार आहे. या शिबिराला वसाहतीतील सर्व सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा