Advertisement

अभिनंदन, तुम्हाला लाॅटरीआधीच म्हाडाचं घर लागलं!


अभिनंदन, तुम्हाला लाॅटरीआधीच म्हाडाचं घर लागलं!
SHARES

म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी हजारो इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. आता लाॅटरीला केवळ ४ दिवस उरले असून घर लागावं हीच एक इच्छा त्यांच्या मनात असेल. अशावेळी काही अर्जदारांना आम्ही लाॅटरीच्या आधीच एक गुडन्यूज देत आहोत. ती म्हणजे अंदाजे ६५ हजारांपैकी असे काही अर्जदार जे लाॅटरीआधीच म्हाडाच्या घराच्या लाॅटरीसाठी विजेते ठरले आहेत, अशा अर्जदारांची यादी आम्ही शोधून काढली आहे.


असे ठरले विजेते

लोकप्रतिनिधी, म्हाडा कर्मचारी आणि माजी सैनिकांच्या गटातील कित्येक घरांना प्रतिसादच न मिळाल्याने, त्यातही दोन घरे असताना त्यासाठी एकच अर्ज आल्याने तो एकमेव अर्जदार आता लाॅटरीसाठी आपोआपच विजेता ठरणार आहे. त्यानुसार संकेत क्रमांक ३३७ कन्नमवारनगर येथील अल्प गटातील लोकप्रतिनिधींसाठी (आजी-माजी आमदार-खासदार) राखीव असलेल्या तीन घरांसाठी केवळ २ अर्ज आल्याने हे दोन्ही अर्जदार विजेते ठरले आहेत.


'हे' आहेत नशीबवान अर्जदार

तर, संकेत क्रमांक ३३७, विक्रोळी कन्नमावरनगर येथील २ घरांसाठी केवळ एक अर्ज आल्याने हा अर्जदारही आपोआप विजेता ठरला आहे. असे अनेक विजेते, लाॅटरी आधीच लाॅटरी लागलेले अर्जदार असू शकतील. त्यातील काही अर्जदार असे.

  • संकेत क्रमांक ३३७-शशिकांत नर्सिंगराव खेडेकर (आजी-माजी खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी)
  • संकेत क्रमांक ३३७-ज्ञानदेव मुकुंद ठाकरे (आजी-माजी खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी)
  • संकेत क्रमाक ३३९-शरद महादेवराव पाटील (आजी-माजी खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी)
  • संकेत क्रमांक ३४५-ज्ञानदेव मुकुंद ठाकरे (आजी-माजी खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी)
  • संकेत क्रमांक ३३८-दर्शना कोळी (म्हाडा कर्मचारी)
  • संकेत क्रमांक ३३८-कमल संजय बडुनो (सरंक्षण दल)
  • संकेत क्रमांक 349-रविथ रविकांत कोळेकर (स्वातंत्र्य सैनिक)
  • संकेत क्रमांक 267 सी-विद्या राजेश कुमार (पत्रकार) 
  • संकेत क्रमांक 338-सच्चिदानंद शिवराज बेलुरे (पत्रकार)
  • संकेत क्रमांक 338-राजीव तुकाराम कुलकर्णी (पत्रकार)
  • संकेत क्रमांक 338-मानव मनोहर मंगलानी (पत्रकार)
  • संकेत क्रमांक 338-आशुतोष सुरेश जोशी (पत्रकार)
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा