Advertisement

सायनच्या गांधी मार्केटजवळ पाणी साचू नये म्हणून पालिकेची 'ही' योजना

या प्रकल्पासाठी १४ कोटी खर्च अपेक्षित असून नागरी स्थायी समितीनं ८ फेब्रुवारीला मंजूर केला आहे.

सायनच्या गांधी मार्केटजवळ पाणी साचू नये म्हणून पालिकेची 'ही' योजना
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सध्या सायनच्या गांधी बाजाराजवळ भूमिगत चेंबरच्या बांधकामाची योजना आखत आहे. पावसाळ्यात या परिसरात पाणी साठत. या सखल भागातून पूर येण्याची शक्यता कमी करण्यासाठी हा एक प्राथमिक उपाय आहे. त्यानंतर चेंबरमध्ये साचलेले जास्त पावसाचे पाणी जवळच्या नाल्यात स्टॉर्मवॉटर ड्रेन (SWD) लाइन वापरून बाहेर टाकले जाईल.

या प्रकल्पासाठी १४ कोटी खर्च अपेक्षित असून नागरी स्थायी समितीनं ८ फेब्रुवारीला मंजूर केला आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू होईल आणि पूर्ण केले जाईल.

प्रशासन सध्या जास्तीत जास्त पावसाचे पाणी काढून टाकण्यासाठी गांधी मार्केटमधील पाण्याच्या पंपांवर अवलंबून आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाण्याची पातळी कमी होण्यास साधारणत: ३ ते ४ तास लागतात. परंतु गेल्या वर्षी पावसाळ्यात या प्रक्रियेस सुमारे ८ तास लागले.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) म्हणाले की, ही योजना २ टप्प्यात राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात किंग सर्कलजवळील भारत नगर रेल्वे नाल्यापर्यंत जास्तीचे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी ९०० मिमी क्षमतेच्या एसडब्ल्यूडी लाइनसह पुलिया आणि चेंबर्स बांधण्यात येणार आहे.

अशीच योजना वांद्रे इथल्या कलानगर भागातही पूर्ण झाली आहे. इथं, अधिकाऱ्यांनी पंपांसह इनलेट नाले बांधले. ज्यात प्रति मिनिट ४९ हजार ८०० लिटर पाणी उपसण्याची क्षमता देण्यात आली. याव्यतिरिक्त, नागरी संस्थेनं पाणी पुन्हा समुद्रात प्रभावीपणे काढण्यासाठी जवळपासच्या ठिकाणी ६ पूर-गेट बांधले.

परंतु गांधी मार्केटच्या या महत्वाकांक्षी योजनेला असूनही काही नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला आहे.

सायन इथल्या नगरसेविका राजेशश्री शिरवाडकर यांनी प्रश्न विचारला की "एवढी मोठी एसडब्ल्यूडी लाईन टाकण्याची योजना असेल तर अडथळा निर्माण झाला तर काय?" काम सुरू होण्यापूर्वी तिनं एसडब्ल्यूडी विभागाकडे सविस्तर सादरीकरण मागितले आहे.

सायन (एफ-उत्तर) चे सहकारी नगरसेवक रवी राजा यांनी या कल्पनेस सहमती दर्शविली. "मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. परंतु यामुळे पुराचा प्रश्न सोडवण्यात मदत होईल की नाही याची शाश्वती नाही."

या चिंतेचे निराकरण करण्यासाठी एफ-उत्तर प्रभागचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त गजानन बेलाले म्हणाले की, प्रदेशात बांधकाम सुरू होण्यापूर्वी एसडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसोबत बैठक होण्याची अपेक्षा आहे.



हेही वाचा

करवसुलीसाठी ठाणे महापालिकेची पथके

राणीची बाग लवकरच सर्वांसाठी खुली होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा