Advertisement

करवसुलीसाठी ठाणे महापालिकेची पथके

कोरोना लाॅकडाऊनमुळे ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता उत्पन्नवाढीसाठी आक्रमक पावलं उचलली आहेत.

करवसुलीसाठी ठाणे महापालिकेची पथके
SHARES

कोरोना लाॅकडाऊनमुळे ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता उत्पन्नवाढीसाठी आक्रमक पावलं उचलली आहेत. अनेक थकबाकीदारांनी पालिकेची कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी देयकं थकवली आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने पथके तयार केली आहेत.

मालमत्ता कराची ५० हजारांहून अधिक थकबाकी असणाऱ्या ६२४८ थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी पालिकेची पथके त्यांच्या घरी धडक देणार आहेत. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. कोरोनामुळे महापालिकेला जुलै महिनाअखेपर्यंत मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली करता आली नाही. शक्य झाले नव्हते. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीवर पालिका प्रशासनाने भर दिला होता. आतापर्यंत मालमत्ता कराची ४९३ कोटींची तर पाणी देयकांची ११५ कोटींची वसुली झाली आहे. 

मागील अनेक वर्षांपासून ५० हजारांपेक्षा जास्त रकमेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यामध्ये ३२५७ रहिवासी मालमत्ता असून त्यांच्याकडे ६७.६६ कोटींचा कर थकीत आहे. तर, २९९१ व्यावसायिक मालमत्ता असून त्यांच्याकडे ७७ कोटींचा कर थकीत आहे. अशा ६२४८ थकबाकीदारांकडून १४४ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात येणार आहे. पालिकेने नागरिकांना घराजवळच कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये वाहनाद्वारे करसंकलन केले जात आहे. 



हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा