बीकेसी ते वाकोला प्रवास होणार सुसाट

  Pali Hill
  बीकेसी ते वाकोला प्रवास होणार सुसाट
  मुंबई  -  

  मुंबई - बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासह इथली वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी एमएमआरडीएनं नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यानुसार बीकेसी, भारत डायमंड बोर्स जंक्शन ते वाकोला ब्रिज जंक्शन असा 1.2 किमी लांबीचा 2 मार्गिकांचा उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. तर सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याकडे जाण्यासाठी मुंबई विद्यापीठ परिसरात 400 मी. लांब आणि 30 मी. रूंद रस्ताही बांधण्यात येणार आहे. या दोन्ही रस्त्यासाठी मुंबई विद्यापीठाची 34 हजार 715 चौरस मीटर इतकी जागा लागणार आहे. ही जागा मुंबई विद्यापीठाकडून एमएमआरडीएला मिळाली असून या जागेच्या मोबदल्यात विद्यापीठाला टीडीआर देण्यात येणार आहे, अशी माहिती महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या टीडीआरच्या विक्रीतून मिळणारी रक्कम वसतिगृह, कर्मचारी निवासस्थानं, गेस्ट हाऊस, सायन ब्लॉक तयार करणं आदी कामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. या उन्नत रस्त्यामुळे बीकेसी ते वाकोला ब्रिज हा 45 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांत पार पडू शकेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.