डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

  Mumbai
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
  मुंबई  -  

  दादर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचा ताबा राज्य सरकारकडे देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात झालेल्या बैठकीत हस्तातराचा निर्णय घेण्यात आला.

  राज्य सरकारकडे जमीन हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला. "तांत्रिक कारणामुळे या कामाला लेट झाला पण ठिक आहे. लवकरच काम सुरू होईल," अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली.

  काँग्रेस आघाडी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जमीन देण्याची घोषणा केली होती. पण आघाडी सरकार घोषणेची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर राज्यात आणि केंद्रात भाजपा आली. भाजपाने स्मारकासंदर्भात दिलेले वचन पाळून जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.