अतिरिक्त वीज बिलानं नागरिक त्रस्त

 Mahul Village
अतिरिक्त वीज बिलानं नागरिक त्रस्त

माहुल गाव - चेंबूरच्या माहुल गाव परिसरातील रहिवाशांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चार ते पाच पट विजेचं बिल येत आहे. तीन महिन्यांपूर्वी कंपनीनं जुनं वीजमीटर काढून नवीन मीटर बसवलं. तेव्हापासून वाढीव बील येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. याबाबत रिलायन्स कार्यालयत अनेक हेलपाटे मारून देखील बील कमी न झाल्याने येथील रहिवाशांनी ही बाब शिवसेना शाखा प्रमुख संजय राठोड यांच्या कानावर घातली. त्यानुसार त्यांनी याबाबत रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना पत्र दिलं आहे. शिवाय यावर लवकरच तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी कंपनीला दिला आहे.

Loading Comments