गिरणी कामगारांच्या घरांची सोडत अडचणीत?

 Pali Hill
गिरणी कामगारांच्या घरांची सोडत अडचणीत?

मुंबई - वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात 2 डिसेंबरला होणारी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत अडचणीत येण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रक समितीला अंधारात ठेवत ही सोडत काढण्यात येणाराय. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे, असा आरोप गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघानं केलाय.

या सोडतीला स्थगिती दयावी, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी संघानं उच्च न्यायालयात दाखल केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलंय. सोडतीतील अनेक त्रुटीही याचिकेद्वारे न्यायालयासमोर मांडण्यात आल्यात. दरम्यान या याचिकेवर 30 नोव्हेंबरला सुनावणी होणाराय.

Loading Comments