Advertisement

'एमजी हेक्टर २०२१' चे इंटेरिअर असेल अद्ययावत आणि आकर्षक


'एमजी हेक्टर २०२१' चे इंटेरिअर असेल अद्ययावत आणि आकर्षक
SHARES

वर्ष २०१९ पासून भविष्यातील आव्हानं आणि संधीना ओळखत एमजी मोटर इंडिया नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनं लॉंच करत आहे. याच दरम्यान पुढच्या महिन्यात लॉन्च अपेक्षित असणा-या 'एमजी हेक्टर २०२१' च्या इंटेरिअर संबंधित माहिती उघड झाली असून ते अद्ययावत आणि आकर्षक असणार आहे. ही अपडेटेड एसयूव्ही सिंगल टोन (ब्लॅक) इंटेरिअर, ड्युएल-टोन इंटेरिअर, ड्युएल टोन-एक्सटेरिअर अशा अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

हेक्टर २०२१ मध्ये वायरलेस चार्जिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स (या सेगमेंटमध्ये प्रथमच) असतील. तसेच यात बेज व ब्लॅक अशा ड्युएल टोनमध्ये इंटेरिअरचा पर्याय असेल. जेणेकरून केबिन अधिक हवेशीर व प्रीमियम अनुभव देईल.

एमजी हेक्टरने भारतात देशातील पहिली इंटरनेट एसयुव्ही एमजी हेक्टर, पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही एमजी झेडएस ईव्ही आणि पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर सादर केली आहे. या सर्वांना ग्राहकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. एमजी मागील ९६ वर्षांमध्ये एक आधुनिक, फ्यूचरिस्टिक आणि इनोव्हेटिव्ह ब्रँडच्या रुपात विकसित झाला आहे. एमजी मोटर इंडियाचा गुजरातमधील हलोल येथे स्वत:चा कार निर्मिती प्रकल्प आहे. त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ८०,००० वाहनांची असून तेथे जवळपास २,५०० कामगार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा