Advertisement

मुंबईकरांनो तयार रहा, वीजेचं बिल वाढण्याची शक्यता

वीज ग्राहकांना अत्यंत मर्यादीत प्रमाणात सरासरी वीज बिल आकारण्यात आलं. परंतु या नंतरचं वीज बिल हे प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार येणार असल्याने ते जास्त असू शकतं.

मुंबईकरांनो तयार रहा, वीजेचं बिल वाढण्याची शक्यता
SHARES

मागील २ महिन्यांच्या तुलनेत मुंबईकरांचं जून महिन्यातील वीजेचं बिल काही प्रमाणात वाढलेलं असू शकतं. त्यामुळे वीज ग्राहकांनी आतापासूनच त्याची तजवीज करून ठेवलेली बरी. यामागचं कारण म्हणजे अदानीसहीत मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या इतर कंपन्या पुन्हा एकदा मीटर रिडींग घ्यायला सुरूवात करत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना प्रत्यक्ष वापरलेल्या युनिटनुसारच जून महिन्याचं बिल (The power bills for the month of June in Mumbai are likely to be higher than the previous months for many consumers) भरावं लागणार आहे.

लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून वीज कंपन्यांनी मीटर रिडींग घेणं थांबवलं होतं. त्यामुळे वीज ग्राहकांना डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या महिन्यांच्या सरासरी एवढं वीज बिल मार्च ते मे दरम्यान आकारण्यात आलं होतं. हिवाळ्यात वीजेचा वापर कमी असतो. जे सरासरी बिल वीज ग्राहकांना आकारण्यात आलं होतं, ते याच कालावधीतील होतं. त्यामुळे प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार येणारं बिल कदाचित काही ग्राहकांसाठी जास्त असू शकतं, अशी माहिती वीज कंपनीतील अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा- 'या' झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले

 उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वीजेचा वापर नेहमीच वाढलेला असतो. त्यातही लाॅकडाऊनच्या काळात बहुतांश जनता आपापल्या घरातच असल्याने वीजेचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. तरीही त्यातुलनेत वीज ग्राहकांना अत्यंत मर्यादीत प्रमाणात सरासरी वीज बिल आकारण्यात आलं. परंतु या नंतरचं वीज बिल हे प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार येणार असल्याने ते जास्त असू शकतं. त्यातही कंटेन्मेट झोनमध्ये जाण्यात अद्यापही मनाई असल्याने या परिसरातील वीज बिल सरासरीनुसारच येतील. वीज कंपन्यांनी वीज देयक नेहमीप्रमाणे घरोघरी वाटले नसले, तरी  बहुतेक ग्राहकांनी या काळात आॅनलाइन पद्धतीने वीज देयक भरलेले आहेत.  

दरम्यान, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांचं ३ महिन्यांचं वीज बिल शासनाने माफ करावं. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान ५० टक्के वीज बिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. सोबतच लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून पुढील ४ महिने वीज बिल थकबाकीमुळे कोणाचाही वीज कापू नये, अशी सूचना रामदास आठवले यांनी वीज कंपन्यांना केली होती.  

हेही वाचा - मार्च, एप्रिल महिन्याचं वीज बिल भरण्यास मुदतवाढ, मुंबईकरांना मिळाला दिलासा  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा