Advertisement

मार्च, एप्रिल महिन्याचं वीज बिल भरण्यास मुदतवाढ

राज्य सरकारने वीज बिल भरण्यास मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सरकारने अशा लोकांनादेखील दिलासा दिला आहे.

मार्च, एप्रिल महिन्याचं वीज बिल भरण्यास मुदतवाढ
SHARES

कोरोनाचा व्हायरसमुळे 3 मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना वीज बिलही भरता आलेलं नाही.  त्यामुळे राज्य सरकारने वीज बिल भरण्यास मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सरकारने अशा लोकांनादेखील दिलासा दिला आहे.  

मार्च महिन्याचे विजेचे बिल १५ मेपर्यंत, तर एप्रिल महिन्याचे बिल ३१ मेपर्यंत भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली. घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रीडिंग घेण्यात येणार नसून मागील महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज बिल तयार करण्यात येणार आहे. 

ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये याकरिता मीटर रीडिंग, वीज बिल वितरित करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहीम, वीजपुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलत आहे. 



हेही वाचा   -
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनानं मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा