Advertisement

घरासोबत लग्न-शिक्षणाचा खर्च, नाश्ता-जेवणही; एसआरए प्रकल्पासाठी बिल्डरची अाॅफर

बिल्डरने वर्तमानपत्रात दोन पान भरून रविवारी एक जाहिरात छापून आणली आहे. त्यानुसार मानव बिल्डरने मोफत घराबरोबर पाच लाखांचा विमा, मुलीच्या लग्नासाठी दर वर्षी एक लाख अशी दहा वर्षे रक्कम, मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख अशी दहा वर्षे रक्कम देऊ केली आहे. तर अनेक सुखसोयीही देऊ केल्या आहेत.

घरासोबत लग्न-शिक्षणाचा खर्च, नाश्ता-जेवणही;  एसआरए प्रकल्पासाठी बिल्डरची अाॅफर
SHARES

आम के आम गुठलीओ के दाम ही म्हण देऊन एखाद्या साड्याच्या दुकानांत, शॉपिंग सेंटरमध्ये वा इतर खरेदीवर अशी खास ऑफर ऐकायला मिळते. पण आता ही अशी खास ऑफर एका बिल्डरने दिली आहे आणि तीही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडपट्टीवासियांना असं कुणी तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला एसआरए प्रकल्प मिळावा यासाठी गुजरातमधील एका बिल्डरने एसआरएअंतर्गत पुनर्वसन करत घराबरोबर मुलीच्या लग्नाचा खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची हमी दिली आहे.

तर प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाख रुपयांचा विमा इतकंच काय तर सोसायटीच प्रत्येक मिटिंगला मिटिंगला नाश्ता आणि जेवणही देऊ केलं आहे. घराबरोबर या अशा अनोख्या ऑफर देत झोपडपट्टीवासियांना आकर्षित करण्यासाठी या बिल्डरनं वर्तमानपत्रात पान भरून जाहिरातही छापली आहे.


चमणकर बिल्डरला दणका

अंधेरी आरटीओ परिसरातील ८०० झोपड्यांचा पुनर्विकास इंटिग्रेटेड स्लम स्कीमअंतर्गत २००६  मध्ये चमणकर बिल्डरला देण्यात आला होता. या पुनर्विकासात बिल्डरला झोपड्यांबरोबर दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मलबार हिलमध्ये हाय माऊंटन सरकारी गेस्ट हाऊस आणि आरटीओ संकुल बांधून देणं बंधनकारक होतं. त्यानुसार दिल्लीत महाराष्ट्र सदन उभं राहिलं. पण त्यात घोटाळा झाल्याचा आरोप झाला नि संपूर्ण प्रकल्प वादात अडकला. दुसरीकडे महाराष्ट्र सदन पूर्ण करणाऱ्या या बिल्डरने केवळ १५५ झोपड्यांचच पुनर्वसन केलं. तर बाकी झोपड्यांच्या  पुनर्विकासाची एक वीटही रचली नाही. त्यामुळे पुनर्विकास रखडला. शेवटी हा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी एसआरएने चमणकर बिल्डरला दणका देत त्यांच्याकडून हा प्रकल्प काढून घेतला.

निवडणुकीत बिल्डर निवडणार

आता हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहा बिल्डर पुढे आले असून बॅलेट पेपरने निवडणूक घेत बिल्डरची निवड केली जाणार आहे. ३ ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून सहाही बिल्डरांनी रहिवाशांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बॅनरबाजी केली आहे. अगदी राजकीय निवडणुकीप्रमाणं इथं निवडणुकीचा फड रंगला आहे. पण यात बाजी मारली आहे ती गुजरातमधील मानव बिल्डरने.

अनोखी जाहिरात 

या बिल्डरने वर्तमानपत्रात दोन पान भरून रविवारी एक जाहिरात छापून आणली आहे. त्यानुसार मानव बिल्डरने मोफत घराबरोबर पाच लाखांचा विमा, मुलीच्या लग्नासाठी दर वर्षी एक लाख अशी दहा वर्षे रक्कम,  मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख अशी दहा वर्षे रक्कम देऊ केली आहे. तर अनेक सुखसोयीही देऊ केल्या आहेत. सोसायटीच प्रत्येक मिटिंगला नाश्ता आणि जेवणही हा बिल्डर देणार आहे. या बिल्डरच्याऑफर आणि निवडणूक चिन्हासह केलेली ही अनोखी जाहिरात सद्या चर्चेचा विषय ठरली आहे. तर आता या ऑफरनंतर तरी हा बिल्डर झोपडीधारकांना आकर्षित करतो की दुसराच कुणी बिल्डर बाजी मरतो हे ३ ऑक्टोबरलाच समजेल.



हेही वाचा -

येताहेत म्हाडाची दुकानं, लवकरच होणार ई-आॅक्शन

म्हाडाकडून गरीबांची चेष्टा! अत्यल्प गटातील घरं ३० लाख ७१ हजारांत!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा