• मेट्रोमुळे ट्रॅफिक जाम
  • मेट्रोमुळे ट्रॅफिक जाम
  • मेट्रोमुळे ट्रॅफिक जाम
  • मेट्रोमुळे ट्रॅफिक जाम
SHARE

घाटकोपर - गोळीबार रोडवर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यात या रोडवर दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रोडवर ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. पूर्वीसारखी दुहेरी वाहतूक येथे शक्य नाही. त्यामुळे स्थानिकांनी इथे एकेरी मार्ग करावा अशी मागणी केलीय. घाटकोपर स्टेशनपासून ते अमृतनगर हे अंतर आधी अवघ्या काही मिनिटात पार होत होते. पण आता याच मार्गावर एक तास लागतो. तसेच या रोडची अवस्था ही वाईट असल्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, असे ट्रॅफिक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक बोराडे यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या