Advertisement

‘ट्रान्सहार्बर लिंक’चे भविष्यात मोठे फायदे- उद्धव ठाकरे

‘ट्रान्सहार्बर लिंक’ प्रकल्पामुळे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार आहे.

‘ट्रान्सहार्बर लिंक’चे भविष्यात मोठे फायदे- उद्धव ठाकरे
SHARES

‘ट्रान्सहार्बर लिंक’ प्रकल्पामुळे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार असून त्यामुळे मुंबई शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. मुंबई व नवी मुंबई आणि कोकण यामधील अंतर कमी झाल्यामुळे इंधन व वाहतूक खर्चात बचत होणार असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पांच्या कामांची उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए.राजीव आदी उपस्थित होते. 

एमएमआरडीएच्या (mmrda) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सहार्बर लिंकचा प्रस्ताव सुमारे ३० वर्षापूर्वीपासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा या दरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता. शासनाने ४ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी एमएमआरडीएकडे असेल, असं आदेशित केलं. 

हेही वाचा- पर्यटन विकासातून पालघरचा विकास करणार- उद्धव ठाकरे

ट्रान्सहार्बर लिंक हा यापूर्वी रस्ते वाहतूक प्रकल्प म्हणून नियोजित होता. महाराष्ट्र शासनाने ८ जून २०११ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे मुंबई पारबंदर प्रकल्पास प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

प्रकल्पात मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३ + ३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची (पोहोचमार्ग – approaches) लांबीचा ५.५ किमी इतकी आहे या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व नवी मुंबईतील शिवाजीनगर, राज्य मार्ग – ५४ व राष्ट्रीय महामार्ग ४ ब वर चिले गावाजवळ आंतरबदल (Interehanges) आहेत.

या प्रकल्पाची अंमलबजावणी जायका (JICA – Japan International Cooperation Agency) या जपानी शासन पुरस्कृत संस्थेकडून कर्ज प्राप्त करून करण्यात येत आहे.  

कंत्राटदारांना २३ मार्च, २०१८ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत प्रकल्पाची अर्थिक प्रगती सुमारे ४२% इतकी झाली आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षे आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा