Advertisement

लोकल प्रवासामुळे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ? आरोग्यमंत्री म्हणाले...

मुंबईसहीत राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

लोकल प्रवासामुळे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ? आरोग्यमंत्री म्हणाले...
SHARES

मुंबईत १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी ठराविक वेळेच्या मर्यादेत लोकलचे दरवाचे उघडण्यात आले आहेत. परंतु मुंबईसहीत राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. विविध जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे. 

मागील १० दिवसांत मुंबई परिसरात दररोज २००हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेने मुंबईकरांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. लोकल प्रवासात वेळेची बंधनं असली तरी गेल्या १० दिवसांपासून पूर्वीप्रमाणं लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. 

परिणामी रुग्णवाढीमुळे प्रवाशांना अद्याप तरी लोकलमधून पूर्णवेळ प्रवास करता येणार नसल्याचं महापालिकेने (bmc) स्पष्ट केलं आहे. त्यामुळं दिवसभर प्रवासाची मुंबईकरांची मागणी तूर्तास पूर्ण होणं कठीण जाणार आहे. असं असलं, तरी राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी राज्यात ३६७० कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांची वाढ झाली व नवीन २४२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९७२४७५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३१४७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५.९१ % झालं आहे.

(maharashtra health minister rajesh tope reacts on mumbai local and coronavirus)


हेही वाचा-

मुंबईकरांच्या दिवसभर प्रवासाच्या मागणीवर तूर्तास निर्बंध

महाराष्ट्रात सरसकट निर्बंध उठवणार नाही- उद्धव ठाकरे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा