Advertisement

'एमएमआरसी'चा पराक्रम! कामास बंदी असलेला आरे परिसर बॅरिगेटींगने बंद


'एमएमआरसी'चा पराक्रम! कामास बंदी असलेला आरे परिसर बॅरिगेटींगने बंद
SHARES

राष्ट्रीय हरित लवाद असो की उच्च न्यायालय सर्वांचे आदेश धाब्यावर बसवत मनमानीपणे काम करण्याचा सपाटाच गेल्या काही महिन्यांपासून 'मुंबई  मेट्रो रेल काॅर्पोरेशन' (एमएमआरसी) ने लावला आहे. रात्री १० नंतर मेट्रो-३ चे काम करण्यास बंदी असतानाही रात्री काम करणाऱ्या 'एमएमआरसी'ने आता आणखी एक पराक्रम केला आहे. तो म्हणजे ज्या आरे परिसरात कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी आहे, तो परिसर बॅरिगेट्सने बंद करून 'एमएमआरसी'ने आतमध्ये काम सुरू केले आहे. न्यायालयाच्या आदेशाला झुगारणाऱ्या 'एमएमआरसी'च्या या मुजोरीचा पदार्फाश 'सेव्ह आरे' आणि 'वनशक्ती'ने केला आहे.

मेट्रो-३, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाच्या कामासाठी आरेची जागा घेण्यास विरोध करत वनशक्तीने थेट राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. त्यानुसार आॅगस्ट २०१५ मध्ये लवादाने संपूर्ण आरे मिल्क काॅलनी परिसरात कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घातली आहे. 'एमएमआरसी'ने २०२१ मध्ये मेट्रो सेवेत दाखल करण्याचे आश्वासन सरकारला दिले आहे. मात्र रात्रीचे काम बंद असल्याने मेट्रोच्या कामावर परिणाम होत आहे. त्याहीपेक्षा कामाला मोठा फटका बसतोय तो आरेचे काम पूर्ण ठप्प असल्यामुळे. हे काम सुरू झाले नाही, तर २०२१ मध्ये मेट्रो-३ सेवेत दाखल करणे अशक्यप्राय आहे.



याच धर्तीवर आता एमएमआरसीने लपूनछपून काम सुरू केले आहे. आरेतील जेव्हीआरएल ते पिकनिक पाॅईंटचा परिसर बॅरीगेट्स लावून बंद करण्यात आला असून त्यापुढेही बॅरीगेट्स लावण्याचे काम सुरू आहे. रविवारी सेव्ह आरे आणि वनशक्तीच्या सदस्यांनी आरेला भेट दिल्यावर ही धक्कदायक बाब उघड झाल्याची माहिती सेव्ह आरेच्य सदस्या तसनीम शेख यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. 'एमएमआरसी' वारंवार न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असून सरकार मात्र 'एमएमआरसी'ला पाठिशी घालत असल्याचे म्हणत सेव्ह आरे आणि वनशक्तीने 'एमएमआरसी'सह सरकारविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.


पोलीस तक्रार करणार

दोन वर्षांपासून कामास बंदी असतानाही 'एमएमआरसी'कडून आरेत छोटी-छोटी काम सुरूच होती. पण आता 'एमएमआरसी'ने हद्द पार केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बॅरिगेटींग करत आतमध्ये राजरोसपणे काम सुरू केले आहे. हा न्यायालयाच्या आदेशाचा भंग असून याविरोधात पोलीस तक्रार दाखल करत 'एमएमआरसी'विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत.

-झोरू बाथेना, सदस्य, सेव्ह ट्री


याविषयी 'एमएमआरसी'च्या प्रवक्त्याशी संपर्क साधला त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा