Advertisement

एमएमआरसीकडून पुन्हा आरेत कामाला सुरुवात


एमएमआरसीकडून पुन्हा आरेत कामाला सुरुवात
SHARES

राष्ट्रीय हरित लवादाने मागील काही महिन्यांपासून आरेमध्ये मेट्रो-3 अंतर्गत कोणतेही काम करण्यास बंदी घातली आहे. असे असताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून सातत्याने आरेमध्ये लवादाच्या आदेशाचा भंग करत कामाला सुरूवात केली जात आहे. तर याविषयी तक्रार केल्यानंतर काम बंद केले जाते. मग पुन्हा काही दिवसांनी कामाला सुरूवात होते, मग पुन्हा तक्रार, मग पुन्हा काम बंद. असा प्रकार सध्या आरेमध्ये पहायला मिळत आहे. 


एमएमआरसी विरूद्ध पर्यावरण प्रेमी

साधारणत: महिन्याभरापासून आरेत काम सुरू करण्याचा एमएमआरसीचा डाव सेव्ह आरे ग्रुपने हाणून पाडल्यानंतर आता पुन्हा शुक्रवारपासून एमएमआरसीने आरेत कामाला सुरुवात केली आहे. तर एमएमआरसीच्या या बेकायदा कामाबाबत सेव्ह आरेने शुक्रवारी रात्री संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती सेव्ह आरेचे सदस्य बिजू अगस्तीन यांनी दिली आहे. त्यामुळे आता आरेच्या मुद्यावरून पुन्हा एमएमआरसी आणि पर्यावरणवादी आमनेसामने आले आहेत.


बंदी असूनही बांधकाम?

आरेतील 33 हेक्टर जागेचा वापर कारडेपोसह मेट्रो-3 अंतर्गत इतर कामांसाठी केला जाणार आहे. पण ही जागा मेट्रो-3 च्या कामासाठी देण्यास विरोध करत सेव्ह आरेने राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. त्यानुसार लवादाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरेत कोणतेही बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. पण लवादाच्या या आदेशाला हरताळ फासत एमएमआरसी वारंवार येथे काम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. तर एमएमआरसीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या सेव्ह आरेकडून त्यांचा डाव हाणून पाडला जात आहे.

शुक्रवारी सकाळी आरेतील युनिट 19 च्या जवळ एमएमआरसीने मोठाल्या मशिन लावत कामाला सुरूवात केली. याची माहिती मिळताच सेव्ह आरेच्या सदस्यांनी तिथे धाव घेतली. सेव्ह आरेने कंत्राटदारांनाकाम थांबवण्यास सांगितले असता कामासंबंधी सर्व प्रकारच्या परवानग्या असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सेव्ह आरे ग्रुपने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत एमएमआरसीविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी काम बंद ठेवण्यात आले आहे. पण सोमवारी पुन्हा कामाला सुरूवात होण्याची शक्यता असल्याने सेव्ह आरेचे सदस्य यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कारण कामासाठीची सर्व यंत्रणा अजूनही जशीच्या तशी कामाच्या ठिकाणी आहे.

शनिवारी सेव्ह आरेच्या सदस्यांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडत कामाच्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची मागणी उचलून धरली. पण संध्याकाळी उशीरापर्यंत एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांकडून ही कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत. जोपर्यंत कागदपत्र दाखवत नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा सेव्ह आरे सदस्यांनी घेतला आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा