करीरोड येथे कबड्डी स्पर्धेचा थरार

  Mumbai
  करीरोड येथे कबड्डी स्पर्धेचा थरार
  मुंबई  -  

  करीरोड येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत शुक्रवारी जय भारत, सर्वोत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव, श्री छत्रपती, बालवीर या संघांनी स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. पुरुषांच्या सामन्यात जय भारत सेवा संघानं जय खापेश्वरचा ३०-१५ असा सहज पराभव केला. मध्यांतराला १४-०८ अशी आघाडी घेणाऱ्या जय भारतनं उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळी करीत हा विजय सोपा करत आपल्या खिशात टाकला. मनिष दळवी, सौरभ खामकर, चेतन परब या विजयाचे शिल्पकार ठरले. खापरेश्वरचा जयेश होरंबळ एकाकी लढला. सर्वोत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं शिवाजी स्पोर्टसचा ४०-३ असा पराभव केला. त्यात गणेश पार्टे, गणेश कदम यांच्या चतुरस्त्र खेळानं गणेशोत्सव मंडळानं विश्रांतीला १८-०९ अशी भक्कम आघाडी घेतली होती. तर उत्तरार्धात मात्र त्यांना शिवाजीच्या सरन, अय्यप्पा यांनी प्रतिकार केला. इतर सामन्यात श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेनं महाराष्ट्र स्पोटर्सला ३५- २२ तर बालवीरनं रत्नकुमारला ३५-१९ असं नमवित दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.