Advertisement

कबड्डी स्पर्धेत आंबेडकर, एमडी कॉलेजच्या मुलींची विजयी सलामी


कबड्डी स्पर्धेत आंबेडकर, एमडी कॉलेजच्या मुलींची विजयी सलामी
SHARES

मुलींच्या आंतरमहाविद्यालयीन गटात झालेल्या कबड्डी स्पर्धेत डॉ. आंबेडकर ज्युनिअर कॉलेज आणि एमडी-महर्षी दयानंद ज्युनिअर कॉलेज या संघांनी विजय मिळवला. ही स्पर्धा ज्युनिअर कॉलेज स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे आयोजित करण्यात आली होती.


विल्सन कॉलेजचा पराभव

डॉ. आंबेडकर ज्युनियर कॉलेज संघाने विल्सन ज्युनियर कॉलेजचा ३७ गुणांनी पराभव केला. यामध्ये सोनाली जाधवने चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अष्टपैलू सोनाली जाधव, प्रीती पवार, प्रणाली जाधव यांच्या चढाई आणि पकडीच्या आक्रमक खेळामुळे विल्सन कॉलेजच्या खेळाडू संपूर्ण लढतीत दडपणाखाली खेळल्या. आंबेडकर कॉलेजच्या खेळाडूंसमोर प्रतिस्पर्धी असलेल्या विल्सन कॉलेजला फार काळ टिकता आले नाही. परिणामी डॉ. आंबेडकर ज्युनियर कॉलेजने ५२-१५ असा मोठा विजय मिळवला.


दुसऱ्या सामन्यात एमडीचा विजय

दुसऱ्या सामन्यात एमडी-महर्षी दयानंद कॉलेजने अस्मिता ज्युनियर कॉलेज संघावर २२ गुणांनी विजय मिळवला. या रोमांचक सामन्यात महर्षी दयानंद कॉलेजच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत आपला दबदबा टिकवून ठेवला. कप्तान ज्योती डफळे, साधना विश्वकर्मा, गार्गी विचारे, प्रीती हंडे यांनी अप्रतिम खेळ करून महर्षी दयानंद कॉलेजला २६-४ असा एकतर्फी विजय मिळवून दिला.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा