Advertisement

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचा मुहुर्त ठरला

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची निवडणूक २५ ऑगस्ट रोजी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे होणार आहे.

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचा मुहुर्त ठरला
SHARES

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची निवडणूक २५ ऑगस्ट रोजी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे होणार आहे. विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडणुकीबाबत घोषणा केली.

कामाला वेग

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीची अधिसूचना संलग्न संस्था प्रतिनिधींना पाठवण्याच्या कामाला वेग आला आहे. तसंच, लवकरच यासंदर्भातील परिपत्रक सर्वाना पाठवण्यात येणार आहे. डॉ. संतोष कुमार जैसवाल (निवृत्त न्यायाधीश) आणि रवींद्र देसाई हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

एकमताने निवड

यंदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रतिनिधींनी सहकार्य करण्याची आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकारी समिती सदस्यांनी अमोल कीर्तिकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे.हेही वाचा -

अकरावीचे अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर

मागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम, बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशाराRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा