Advertisement

अकरावीचे १६,३३४ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर

अकरावीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पहिल्या प्राधान्यक्रमाचं महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यानं तब्ब्ल १६ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागल्याची माहिती समोर येत आहे.

अकरावीचे १६,३३४ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर
SHARES

अकरावीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पहिल्या प्राधान्यक्रमाचं महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यानं तब्ब्ल १६ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागल्याची माहिती समोर येत आहे. पहिली प्रवेश फेरी, दुसरी प्रवेश फेरी आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे प्रवेश मिळून जवळपास ९५ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

प्रथमप्राधान्यक्रमाचं महाविद्यालय

पहिल्या फेरीत ४८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना प्रथमप्राधान्य क्रमाचं महाविद्यालय मिळालं होतं. यापैकी ३६ हजार ७७० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. तसंच, दुसऱ्या फेरीत १६ हजार ३३६ विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्यक्रमाचं महाविद्यालय मिळालं होतं त्यामधील १२ हजार ९४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. तिसऱ्या फेरीत महाविद्यालयाच्या प्राधान्यक्रमामध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत बदल करता येणार आहेत.

कोट्यातून प्रवेश

प्रथम प्राधान्यक्रमाचं महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातूनही प्रवेश निश्चित केले आहेत. आतापर्यंत ३५ हजार ७८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कोट्यांतून झाले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी १ लाख ८ हजार २१७ जागांवर प्रवेश होणार असून साधारण ८० ते ९० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. मंगळवारी तिसरी प्रवेश यादी जाहीर होणार आहे.हेही वाचा -

मागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम, बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा