Advertisement

पटना पाइरेट्सचा 69-30 ने विजय


पटना पाइरेट्सचा 69-30 ने विजय
SHARES

प्रो कब्बडीच्या पाचव्या सीझनमध्ये सोमवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एलिमिनेटर फेरीत पटना पाइरेट्सने हरियाणा स्टीलर्सवर 69-30 आशा फरकाने मात करत विजय मिळवला

अर्ध्या वेळेत पटनाने 22-15 अशी मोठी आघाडी घेत आपला दबदबा सामन्यात दाखवला. दुसऱ्या सत्रातही पटनाच्या प्रदीप नरवालने रेकॉर्डब्रेक खेळी करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. या सीजनमध्ये प्रदीपने एकूण 300 रेड पॉईंट्सपर्यंत आपली उंची गाठली.

हरियाणा संघाने देखील प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या आक्रमक लढाऊ खेळीत थोडा अयशस्वी ठरला. हरियाणाच्या प्रशांत राय याने 8, विकास कंडोला आणि दीपक दहिया याने 6-6 गुण आपल्या नावावर केले. हरियाणासोबत विजय प्राप्त केलेल्या पटना संघाचा एलिमिनेटर 3 मध्ये पुणेरी पलटण सोबत सामना होणार आहे. तर हरियाणा संघ या सिजनमधून बाहेर पडला आहे. हा सामना सोमवारी एनएससीआय स्टेडिअम येथे खेळवण्यात आला.


हेही वाचा - 

पुणेरी पलटणकडून यू मुम्बाचा पराभव


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा