Advertisement

रविवारी कांदिवलीत रंगणार मुंबई श्रीचा थरार


रविवारी कांदिवलीत रंगणार मुंबई श्रीचा थरार
SHARES

मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष रविवारी रंगणार अाहे. मात्र शनिवारी होणाऱ्या प्राथमिक फेरीसाठी तब्बल १५० पेक्षा अधिक दिग्गज, उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटू अापले नशीब अजमावतील. कांदिवलीच्या ग्रोवेल मॉलमध्ये ९ गटात होणाऱ्या प्राथमिक फेरीतून ५४ खेळाडूंची निवड केली जाणार आहे.


मुंबईचे शरीरसौष्ठवपटू सज्ज

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव फिटनेस संघटना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या मुंबई श्री स्पर्धेत मुंबईतील शरीरसौष्ठवाची खरी संपत्ती मंचावर अवतरणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या महाराष्ट्र श्रीसाठी मुंबईचा संघही याच स्पर्धेतून निवडला जाणार आहे. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबर फिजीक स्पोर्टस प्रकारही रंगणार आहे.


११ लाखांची बक्षिसं

नऊ गटात होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ११ लाखांची रोख बक्षिसे देण्यात येणार अाहेत. मुंबई श्रीचा मानकरी दीड लाखांचा तर उपविजेता ७५ हजारांचा मानकरी ठरेल. तसंच तिसऱ्या क्रमांकाच्या शरीरसौष्ठवपटूलाही ३७.५ हजार रुपयांचे रोख इनाम देण्यात येणार अाहे.


अाशुतोष साहाकडे नजरा

अनेक दिग्गज खेळाडू उतरणार असले तरी सर्वांच्या नजरा आशुतोष साहाकडे लागलेल्या असतील. या उदयोन्मुख खेळाडूने गेल्या दोन महिन्यात ज्युनियर मुंबई श्री, ज्युनियर महाराष्ट्र श्री आणि ज्युनियर भारत श्री अशी अनोखी हॅटट्रिक साजरी केली आहे. तसेच सुजय पिळणकर, सौरभ साळुंखे, रोहन गुरव, सुशांत रांजणकर, दीपक तांबिटकर यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा