Advertisement

यू मुम्बाचा ३०-२८ विजय


यू मुम्बाचा ३०-२८ विजय
SHARES

शुक्रवारी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रो कबड्डीच्या सामन्यात यू मुम्बाने पाचव्या सिझनमध्ये दमदार विजय मिळवला. यामध्ये यू मुंम्बाने दबंग दिल्लीला २८-३० अशा फरकाने नमवले.

काशिलिंग अडके आणि श्रीकांत जाधव यांच्या शानदार खेळामुळे यू मुम्बा संघाला विजय मिळवणे सोयीस्कर झाले. काशिलिंगने या सामन्यात ७ गुणांची चढाई केली, तर श्रीकांत जाधवने सर्वाधिक ११ गुणांची कमाई केली.

दुखापतीतून सावरल्यानंतर शुक्रवारी शब्बीर बापू याला या सामन्यात संधी देण्यात आली. सुरुवातीपासून दबंग दिल्लीने आघाडी मिळवत सामन्यात आपले वर्चस्व राखले. पण यू मुम्बाच्या काशिलिंग आणि श्रीकांतच्या शानदार खेळामुळे दिल्लीला सर्वबाद करत सामन्यात बरोबरी साधली. हा सामना अर्ध्या वेळेत १६-१६ असा बरोबरीत होता.

दबंग दिल्लीच्या अबॉलफैजल आणि मिराज शेखने या सामन्यात १० गुणांची कमाई केली. याच संघातील रोहित बलियानने ४ आणि सुनीर कुमार याने देखील ४ गुणांची कमाई केली. दंबग दिल्ली १३ सामने खेळून २९ गुणांनी सहाव्या स्थानावर आहे, तर यू मुम्बा १४ सामने खेळून ४४ गुणांनी तिसऱ्या स्थानावर आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा