Advertisement

'प्रो' कबड्डीला आजपासून सुरुवात, यू मुंबा-पुणेरी पलटण आमनेसामने


'प्रो' कबड्डीला आजपासून सुरुवात, यू मुंबा-पुणेरी पलटण आमनेसामने
SHARES

देशभरात अाजपासून प्रो-कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. रविवारी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू बंदिस्त स्टेडियमवर पटना पायरेट्स आणि तमिळ थलाईवाज या दोन संघात सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्राच्या संघांमध्ये लढत होणार आहे.


किती वाजता?

पटना पायरेट्स आणि तमिळ थलाईवाज यांचा रंगतदार सामना आज रात्री ८.०० वाजता होणार आहे. तसंच यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांचा सामना रात्री ९.०० वाजता सुरू होणार आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये एकूण १३८ सामने खेळवले जाणार असून ५ जानेवारी रोजी अंतिम सामना होणार आहे.


१ कोटींचा अत्रचली

यंदा यू मुंबाने तब्बल १ कोटी रुपयांची बोली लावत फझल अत्रचलीला अापल्या संघात विकत घेतलं अाहे. त्याचप्रमाणं प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात कोट्यवधी रुपयांची बोली लागलेला फझल अत्रचली हा पहिला खेळाडू ठरला अाहे.
प्रो कबड्डीमध्ये भि़डणार १२ संघ

 • तमिळ थलायवाज (चेन्नई)
 • तेलुगू टायटन्स (हैद्रराबाद)
 • जयपूर पिंक पॅंथर्स (जयपूर)
 • पुणेरी पलटण (पुणे)
 • यू मुंबा (मुंबई)
 • दबंग दिल्ली (दिल्ली)
 • बंगाल वॉरियर्स (कोलकाता)
 • हरियाणा स्टीलर्स (हरियाणा)
 • गुजरात फॉर्चुन जाएंट्स (गुजरात)
 • यूपी योद्धा (यूपी)
 • बेंगलुरू बुल्स (बंगळुरु)
 • पटणा पायरेट्स (पटना)हेही वाचा-

पृथ्वीला मराठीतून 'विराट' मंत्र

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवडसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा