Advertisement

सिद्धीप्रभाने पटकावले बीच कबड्डीचे अजिंक्यपद


सिद्धीप्रभाने पटकावले बीच कबड्डीचे अजिंक्यपद
SHARES

प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने मुंबईत प्रथमच अायोजित करण्यात अालेल्या बीच कबड्डी स्पर्धेत सिद्धीप्रभा फाऊंडेशनने अंतिम सामन्यात विजय क्लबचा पराभव करून अजिंक्यपदावर नाव कोरत ओडीएम करंडक पटकावला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अनिकेत भेलसकर (सिद्धीप्रभा), आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू आणि पकडसाठी अभिषेक रूपनर (विजय क्लब) आणि ओंकार ढवळे (सिद्धीप्रभा) यांची निवड करण्यात आली.


सिद्धीप्रभापुढे विजय क्लब नतमस्तक

सुरुवातीपासूनच सिद्धीप्रभा आणि विजय क्लब या दोन बलाढ्य संघांमध्ये विजेतेपदासाठी झुंज पाहायला मिळाली. सिद्धीप्रभाच्या अनिकेत भेलसकर याच्या आक्रमक चढाया अाणि त्याला ओंकार ढवळे याची मिळालेली पकडीची साथ यामुळे सिद्धीप्रभाने विजय क्लबला ४३-३८ असे नमविले. विजय क्लबच्या अभिषेक रुपणार आणि रोशन थापा यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. विजेत्या संघाला ७ हजार अाणि उपविजेत्या संघाला ५ हजार रुपयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात अाले.


हेही वाचा -

बीच कबड्डीत सिद्धीप्रभा, विजय क्लब यांच्यात अंतिम घमासान

प्रभादेवीत वाळूवर रंगणार कबड्डीचा थरार

संबंधित विषय
Advertisement