• पुढील टुर्नामेंटमध्ये टिकणे यू मुम्बासाठी अशक्य
SHARE

प्रो-कबड्डी लीगमधील इंटर झोन वाइल्ड कार्ड सामन्यात तामिळ थलायवाजने झोन ए च्या यू मुम्बा संघाला 38-35 ने मात देत विजय मिळवला. ही लढत मंगळवारी जयपूर येथे रंगली होती. या सामन्याच्या अर्ध्या वेळेत यू मुम्बा संघ 18-15 ने आघाडीवर होता. पण दुसऱ्या सत्रात तामिळ संघाने आक्रमक अशी वापसी करून आपले वर्चस्व राखले. या पराभवामुळे यू मुम्बाला पुढील सामन्यात खेळणे कदाचित अशक्य झाले आहे. तामिळ संघ पाचव्या स्थानावर आहे.


या लढतीत तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने पुन्हा एकदा शानदार खेळाचे प्रदर्शन करत 16 गुण मिळवले. यू मुम्बाकडून दर्शन कदीयानने 8 आणि श्रीकांत जाधवने 7 गुण मिळवले. या सामन्यात कर्णधार अनुप कुमार याला विश्रांती दिल्याने त्याच्या जागी जोगिंदर नरवालने नेतृत्व केले होते.

सुरुवातीला आघाडीवर असलेल्या यू मुम्बाला अखेर पराभवाचा सामना करावा लागला. 22 सेकंदाचा खेळ शिल्लक असताना यू मुम्बा संघावर लोणचे सावट होते. खेळाच्या मध्यंतरापर्यंत चढाई करण्यात यश मिळवलेल्या दर्शन काडियालला खेळाच्या शेवटच्या क्षणाला मात्र अपयश आले.


हेही वाचा - 

यू मुम्बाचा ४५-२३ ने पराभव

यू मुम्बाचा घरच्या मैदानावर पराभव


संबंधित विषय
ताज्या बातम्या