Advertisement

यू मुम्बाचा ४५-२३ ने पराभव


यू मुम्बाचा ४५-२३ ने पराभव
SHARES

यू मुम्बा संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात संघाने उत्तम खेळी करत प्रो कबड्डीच्या पाचव्या सीझन मध्ये यू मुम्बा संघाला ४५-२३ अशा फरकाने मात देत विजय मिळवला. हा सामना बुधवारी गुजरातमधील हरिवंश ताना स्टेडियममध्ये खेळवण्यात आला.  


गुजरात संघाच्या मजबूत अशा डिफेंसच्यासमोर यू मुम्बा संघ संभाळून खेळत आपले खाते बोनस गुणांनी उघडले. सुरुवातीला यू मुम्बा संघ १-४ अशा फरकाने पिछाडीवर होता. पण थोड्याचवेळात काशिलींगने आणखी एक बोनस पॉईंट मिळवत ५-५ अशा फरकाने बरोबरी साधली. त्यानंतर गुजरातची आघाडी मोडूत काढत ९-७ अशी आघाडी घेतली. पण आघाडीवर असलेल्या यू मुंम्बा संघाला पुन्हा पिछाडीवर यावे लागले. दहाव्या मिनिटाला गुजरात संघाने यू मुम्बाला ऑल आऊट करत १३-१० ने आघाडी घेतली.


अर्ध्या वेळेत यू मुम्बा १२-२४ अशी पिछाडीवर 

नंतरच्या वेळेत यू मुम्बाने खेळाचे चांगले प्रदर्शन करत गुण संख्या मिळवत पिछाडीमधील फरक हा कमी केला. परंतु, गुजरातच्या डिफेंसने त्यांना जास्त गुण मिळवू दिले नाही. यामुळे मुंबई संघ पिछाडीवर जात होता. गुजरातने नंतर उत्कृष्ट खेळ करत ३२ व्या मिनिटाला आणखी एकदा यू मुम्बाला ऑल आऊट करत सामन्यात आपला दबदबा तयार केला आणि ३८-२० अशी मोठ्या फरकाची आघाडी मिळवली. याच्या बरोबरीत येणे हे मुंबई संघासाठी नंतर अशक्य झाले होते.


हेही वाचा - 

यू मुम्बाचा घरच्या मैदानावर पहिला विजय!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा