Advertisement

यू मुम्बाचा घरच्या मैदानावर पहिला विजय!


यू मुम्बाचा घरच्या मैदानावर पहिला विजय!
SHARES

मुंबईत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी वरळीच्या एनएससीआय स्टेडिअमवर यू मुम्बा आणि गुजरात फॉर्च्यून जायंट्स यांच्यात होणारा प्रो-कबड्डीचा सामना देखील रद्द करण्यात आला होता. त्यानंतर हा सामना पुढे ढकलत तो गुरुवारी खेळवण्यात आला. ज्यामध्ये घरच्या मैदानावर यू मुम्बा संघाने पहिला विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे.



या सामन्यात यू मुम्बाने गुजरातला 38-32 अशी लढत देत सामना खिशात घातला. यामध्ये कॅप्टन कूल अनुप कुमारने 8 गुणांची कमाई करत आघाडीवर आहे. श्रीकांत जाधवने 6 आणि कुलदीप सिंह याने 7 गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली.
हरयाणाच्या कुलदीप सिंहने 7 गुणांची कमाई केली. त्याला हादी ओश्तनोक आणि सुरिंदर सिंह यांनी चांगली साथ दिली.
यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांत यू मुम्बाला घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर यू मुम्बाला विजय मिळवण्याची गरज होती.



मंगळवारी मुंबईत झालेल्या पावसाचा सामना केल्यानंतर आता यू मुम्बा संघ विजयी झाल्याने मुंबईकरांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटले असणार.



हेही वाचा

मुंबई पोलिस दलाची अमेरिकेत पोलिसगिरी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा